Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दारूची पार्टीची बाब घरी सांगितल्याच्या वादातून तरुणाचा खून !

  दारूची पार्टीची बाब घरी सांगितल्याच्या वादातून तरुणाचा खून ! चोपडा (प्रतिनिधी) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा :- तालुक्यातील विरवाडे ये...

 दारूची पार्टीची बाब घरी सांगितल्याच्या वादातून तरुणाचा खून !


चोपडा (प्रतिनिधी)

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा :-तालुक्यातील विरवाडे येथील तरुणांनी एकत्र येत दोन चार दिवसांपूर्वी दारूची पार्टी केली.पार्टी केल्याची  गोष्ट त्यातीलच एकाने मित्रांच्या घरी सांगितल्याचा राग मनात ठेवत चार ते पाच जणांनी जबर मारहाण करीत त्याच्या डोक्यात लाकडी दांडके टाकले.यात जखमी झालेल्या दादा बारकू ठाकूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने चोपडा शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्राकडून माहिती वरून असे की,दादा ठाकूर आणि काही जणांनी दोन-चार दिवसांपूर्वी पार्टी केली. मात्र दादा ठाकूर यानेच काहींच्या घरी पार्टी केल्याची माहिती दिली, असा संशय आल्याने चार ते पाच जणांनी मिळून गावात दादा ठाकूर यास मारहाण दि.२७/१२/२०२४ रोजी संध्याकाळी केली.बहिरम बाबा चौकात दादा ठाकूर यास  मारहाण केली.या भानगडीत दादा ठाकुर यांच्या डोक्यात लाकडी दांडके (बैल गाडीचा लाकडी दांडका) टाकल्याने तो जबर जखमी झाला. त्यानंतर त्याला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्याला जळगाव येथे सिव्हिल रुग्णालयात घेऊन जायला सांगितले जळगाव येथे प्राथमिक उपचार करून दादा ठाकूर याचा डोक्याला जबर मार लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी दि २८ रोजी दादा ठाकूर यांच्या आईने चोपडा शहर पोलीस स्टेशनला रजुबाई बारकु ठाकुर (वय ५४ वर्षे ) रा.शिवाजी नगर प्लाट परिसर विरवाडे ता.चोपड़ा यांच्या फिर्यादी वरून या तिघांच्या विरोधात पिटू वर्फ अरुण गोबिदा कोळी, दिनेश मधुकर कोळी,शरद संतोष कोळी रा.विरवाडे ता.चोपडा या तिघा विरोधात गुरनं. ६३९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली. चोपडा शहर पोलीसांनी या तिघांना अटक केली आहे.उपविभागीय अधिकारी चोपड़ा अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी प्रत्येकक्षात भेट दिली आहे.जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी चोपड़ा अण्णासाहेब घोलप यांच्या सुचने नुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक मधुकर सावळे हे अधिक तपास करीत आहे.

No comments