मानव कल्याणासाठी मानवी हक्काची जाण होणे आवश्यक -:- प्रा. डॉ.गणेश चव्हाण मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मु...
मानव कल्याणासाठी मानवी हक्काची जाण होणे आवश्यक -:- प्रा. डॉ.गणेश चव्हाण
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : येथील श्रीमती जी. जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगरच्या शिक्षणपूरक उपक्रम समितीमार्फत मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. गणेश सदाशिव चव्हाण यांचे “मानवी हक्क” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. मानवाच्या मूलभूत हक्कांविषयी विद्यार्थ्यांना जाणीव करून देताना ते म्हणाले की, जोपर्यंत जगातील प्रत्येक मानवाला आपल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव होत नाही, तोपर्यंत मानवाचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही. त्याकरिता शासन स्तरावर प्रामाणिकपणे मानवी हक्कांच्या संरक्षणार्थ अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर देखील मानवी हक्क संघटनेच्या मार्फत नि:पक्षपातीपणे न्याय होणे गरजेचे आहे. त्याकरिता वसुदैव कुटुंबकम ही भावना जन माणसात रूढ होणे ही काळाची गरज आहे;असे मत प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी प्रतिपादित केले. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.दीपक बावस्कर यांनी मानव कल्याण हेच प्रत्येक देशाचे अंतिम ध्येय असायला हवे असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ.दत्तात्रय कोळी यांनी केले; तर कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. एस. गवळी यांनी मानले. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.


No comments