adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन

 सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिक्षण शास्त्र...

 सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे दिनांक ९/ १२ /२०२४ रोजी दुपारी बारा ते दोन या दरम्यान महाविद्यालयांमध्ये माउंट व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे कॅम्पस इंटरचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन करण्यामागचे मुख्य हेतू हा होता की, विद्यार्थ्यांना मुलाखतीचा अनुभव येण्यासाठी तसेच मुलाखतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात व ज्या विद्यार्थ्यांना खरोखर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचा आहे त्या सर्वांनी महाविद्यालयात उपस्थित राहून इंटरव्यू दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माउंट व्हॅली स्कूलचे विजय हडप उपस्थित होते. सदर मुलाखतीसाठी एकूण २१ विद्यार्थी शिक्षकांनी मुलाखत दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रतिभा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.जयश्री पाटील यांनी केले.

कार्यक्रम घेण्यासाठी डॉ.नारायण खडके यांनी परवानगी व मार्गदर्शन दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिता वानखेडे, डॉ.प्रतिभा पाटील, डॉ.जयश्री पाटील, प्राध्या.सुवर्ण अहिरे, प्राध्य.निधी शर्मा, प्राध्यजयश्री शिंगाडे तसेच अरविंद पवार, पंकज वाघ , चंद्रकांत सपकाळे यांचे सहकार्य लाभले.

No comments