प्रेम भंडारी यांचा " निसर्ग- नियम हा काव्यसंग्रह धडगाव येथे TTSF च्या महामेळाव्यात प्रकाशित झाला चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गा...
प्रेम भंडारी यांचा " निसर्ग- नियम हा काव्यसंग्रह धडगाव येथे TTSF च्या महामेळाव्यात प्रकाशित झाला
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
TTSF - ट्रायबल टॅलेंट सर्च फॅऊडेशन, आयोजित युवा स्पर्धा परीक्षा महामेळाव्यात निसर्ग कवी विठ्ठल भंडारी उर्फ प्रेम भंडारी यांचा "निसर्ग-नियम" हा कवितासंग्रह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.धडगाव ता.धडगाव जि.नंदुरबार येथे Trible Tanlent Search Foundation या शैक्षणिक संस्थेचा वार्षिक युवा स्पर्धा परीक्षा महामेळावा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष के.ए.पावरा(निवृत्त प्राचार्य)उद्घाटक जी.व्ही.एस.एन.दत्ता(IAS)प्रमुख मार्गदर्शक कुंदन आर.वळवी(Asst.कमिशनर,मुंबई)वैभव गायकवाड (Dy.Collector)TTSF संस्थेचे संस्थापक अजय खर्डे साहेब(उपायुक्त IRS)नामदेव पटले(अध्यक्ष,आदिवासी पावरा बारेला समाज मंडल)सुरेश मोरे (अध्यक्ष सातपुडा परिसर पावरा समाज उन्नती मंडळ,शहादा)जेलसिंग पावरा (निवृत्त अभियंता)
तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी यांच्या उपस्थित निसर्ग कवी विठ्ठल भंडारी उर्फ प्रेम भंडारी यांचा "निसर्ग-नियम" हा कविता संग्रह प्रकाशित करण्यात आला.प्रेम भंडारी हे शहाणा ता.शहादा जि.नंदुरबार येथील रहिवासी असून ते वैद्यकीय क्षेत्रात औषधनिर्माण अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे बु.ता.शिरपूर जि.धुळे येथे कार्यरत आहेत.वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावत असताना प्रेम भंडारी यांनी आपल्या कविता,कथा,गाणे लिहणे हा छंद जोपासला आहे.प्रेम भंडारी यांना आपल्या आदिवासी पावरा बोलीभाषेवर विशेष प्रेम असल्याने पावरा बोलीभाषेत कविता लिहणे फार आवडते, या पूर्वी ही प्रेम भंडारी यांचा "तीर-कलम" (२०२३)हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तीर कलम या कविता संग्रहाला वाचकांचा खूप मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.जर आपण निसर्गाच्या नियमांचे पालन केले नाही तर येणा-या काळात आपल्याला याचे काय परिणाम भोगावे लागतील ते या गोष्टीवर प्रकाश टाकला आहे.
परिसर व समाजातून प्रेम भंडारी यांचे कौतुक होत आहे.
No comments