स्व.निखिल भाऊ खडसे स्कूल येथे स्कूल कनेक्ट २.० कार्यक्रम संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी :सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड) राष्ट्रीय शै...
स्व.निखिल भाऊ खडसे स्कूल येथे स्कूल कनेक्ट २.० कार्यक्रम संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी :सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांच्या मार्गदर्शन प्रणालीनुसार श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर यांच्याद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट २.० चे आज दिनांक ४ जानेवारी २०२५, रोजी स्व निखिल भाऊ सेमी इंग्लिश मेडियम स्कूल, विद्यालयात विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.विजय डांगे भूगोल विभाग व प्रा.इस्माईल शेख हिंदी विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनावर भाषणात प्रा. विजय डांगे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे भारताचे तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असून या शैक्षणिक धोरणात आणि १९६८ व १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये कुठल्या प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीच्या शैक्षणिक परिघातील विविध क्षेत्रातील आपल्या आवडत्या विषयासंदर्भात रुची निर्माण करणारे, याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण असणार आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या अद्वितीय क्षमतेचा विकास करणारे शिक्षण असेल. यासोबतच अभ्यासक्रमात व प्रवेश प्रक्रियेत लवचिकता, बहुभाषिकता, व्यवसाय आणि रोजगारक्षम इत्यादी वैशिष्ट्यांचा शैक्षणिक धोरणात समावेश आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन केले.
प्रा. विजय डांगे व प्रा. शेख यांचा शाळेतर्फे शाळेचे मुख्याध्यापक व्ही.के. वडस्कर यांनी कार्यक्रमा प्रारंभी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तथा शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक गणेश कोळी यांनी, प्रास्ताविक राजेश्री फेगडे मॅडम तर आभार प्रदर्शन सतीश गायकवाड सर यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
No comments