दोन कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा;५ आरोपींवर गुन्हे दाखल अहिल्यानगर प्रतिनिधी -:- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) शेवगाव शहरामधील...
दोन कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा;५ आरोपींवर गुन्हे दाखल
अहिल्यानगर प्रतिनिधी -:-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
शेवगाव शहरामधील ०२ कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने छापे टाकत
२ लाख ०८,०००/- रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे,संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे,पंकज व्यवहारे,संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे,किशोर शिरसाठ,रमीजराजा आत्तार अशांचे पथक तयार करुन शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.दि. ०५ जानेवारी रोजी पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास बातमीदारामार्फत गोवंशीय जनावरे निदर्यतेने डांबुन ठेवलेली असून तेथे काही इसमांकडून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.प्राप्त माहितीवरून पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचासमक्ष ०२ वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली.त्यामध्ये शेवगाव पोलीस स्टेशनला ५ आरोपीविरुद्ध २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या आरोपीचे ताब्यातुन २,८०,०००/-रूपये किंमत त्यात ३१० किलो गोमांस,२ गायी,१ कालवड,१ वासरू व ४ सुरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
No comments