३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल २५० वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई अहिल्यानगर प्रतिनिधी:- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ३...
३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल २५० वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर प्रतिनिधी:-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर होणाऱ्या गोंधळाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणे,सीट बेल्ट न लावणे, हेल्मेटचा वापर न करणे, विनापरवाना गाडी चालवणे आणि रस्त्यावर धिंगाणा घालणे यासारख्या नियमभंग करणाऱ्या २५० वाहनचालकांवर कारवाई केली.या कारवाईत एकूण २ लाख ८ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.
No comments