पतीकडून लाकडी दांड्याने मारहाण करून पत्नीचा खून अहिल्यानगर प्रतिनिधी:- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर :- जिल्ह्यात श्रीगोंदा तालु...
पतीकडून लाकडी दांड्याने मारहाण करून पत्नीचा खून
अहिल्यानगर प्रतिनिधी:-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील दिवटे वस्ती येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा लाकडी दांडक्याने मारहाण करत खून केल्याची धक्कादायक घटना १९ जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मयत प्रियंका निहाल उर्फ करण दिवटे (वय २२ वर्ष) ही महिला आपल्या सासरी दिवटे वस्ती,पेडगाव येथे राहत होती.तिचा पती निहाल उर्फ करण नवनाथ दिवटे (रा.दिवटे वस्ती, पेडगाव) याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला लाकडी दांडक्याने डोक्यावर,हातावर व पायावर गंभीर मारहाण केली.या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रियंकाचा मृत्यू झाला.या प्रकरणी फिर्यादी राजेश शांताराम काळोखे (वय ४३ वर्ष,रा.कसबा, पाथर्डी) यांनी २० जानेवारी रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.यातील फिर्यादी हे मयत प्रियंकाचे वडील आहेत.त्यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments