adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कला,क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू..

  कला,क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू.. त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) राज्यातील २०१२ ते २०१९ प...

 कला,क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू..


त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

राज्यातील २०१२ ते २०१९ पर्यंत काम केलेल्या कला,क्रीडा, कार्यानुभव अंशकालीन अतिथी शिक्षकांना कायमस्वरूपी नियुक्तीसाठी मागील वर्षी सप्टेंबर मध्ये आंदोलन केले होते तात्कालीन शिक्षण मंत्री, आयुक्तांनी विविध मागण्या संदर्भात दिलेली आश्वासने मात्र अजूनही पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे कला,क्रीडा,कार्यानुभव शिक्षक कृती समितीने २० जानेवारी २०२५ पासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

   शिक्षकांच्या प्रमुख मागण्या

१) १०० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अंशकालीन अतिथी कला,क्रीडा, व कार्यानुभव निदेशकांसाठी २ ते ३ शाळा एकत्र करणे, विस्थापितांना त्या शाळेवर नेमणूक देणे त्यासाठी १४ ऑक्टोबर २०२४ शासन परिपत्रकात सुधारणा करणे.

२) किमान वेतन व सर्व निदेशकांना शिक्षकांचा दर्जा देणे.

३) सर्वांना नेमणूक मिळाल्यानंतर राज्यातील सर्व निदेशकांचा कायम संवर्ग तयार करून कायम नियुक्ती मिळण्यासाठी शासन निर्णय काढून त्याची त्वरित अंमलबजावणी करणे.

     आधी संघटनेच्या मागण्या आहेत अशी माहिती कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.

"प्रतिक्रिया"

ज्या शाळांवर अंशकालीन अतिथी निदेशकांची नियुक्ती झालेली नाही अशा शाळेतील मुलांना कला,क्रीडा,कार्यानुभव विषयांपासून वंचित राहावे लागत आहे.

महाराष्ट्र राज्यातील ज्या शाळेवर १०० पेक्षा कमी पट झालेल्या सर्व शाळांवर अंशकालीन अतिथी शिक्षकांची नेमणूक करावी. २ ते ३ शाळा एकत्र करून नियुक्ती द्यावी. किमान वेतन व सर्व निदेशकांना शिक्षकांचा दर्जा देण्यात यावा. कायम संवर्ग तयार करून कायम नियुक्ती मिळावी.


                    जयवंत हागोटे

                  कार्यानुभव शिक्षक

No comments