लोहारा माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विविध दाखले वाटप महसूल व आदिवासी विभागाचा संयुक्त उपक्रम रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपाद...
लोहारा माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विविध दाखले वाटप
महसूल व आदिवासी विभागाचा संयुक्त उपक्रम
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील लोहारा येथील माध्यमिक आश्रम येथील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला,वयाचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र असे विविध दाखल्यांचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मोफत वाटप करण्यात आले
यावेळी फैजपूर उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तहसीलदार बंडू कापसे यांच्या हस्ते व एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय यावल मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, वय व अधिवास प्रमाणपत्र यां ३०० पेक्षा जास्त दाखले देण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित प्रांताधिकारी बबनराव काकडे रावेर तहसीलदार बंडू कापसे मंडळाधिकारी निलेश धांडे तलाठी गुणवंत बारेला मुख्याध्यापिका शितल पाटील सरपंच सैनाज लियाकत जमादार संजू जमादार शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते


No comments