माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी समाधान पाटील तर जळगाव ग्रामीण जि...
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्षपदी समाधान पाटील तर जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल बोरसे यांची निवड
जळगाव जिल्हा प्रतिनिधी : समाधान पाटील
एरंडोल : एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील पत्रकार समाधान पाटील यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र फाउंडेशन समितीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष पदी तर स्वप्निल बोरसे यांची जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर व महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड राज्य कार्याध्यक्ष सखाराम पंत कुलकर्णी तसेच राज्य संपर्क प्रमुख विकास गोरवडकर यांनी एकमतांनी ठराव घेवून समाधान पाटील यांच्या कामाची दखल घेऊन उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक यापदावरून फेर निवडकरत उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्या अध्यक्ष पदोन्नती करण्यात आली.तथा स्वप्निल बोरसे यांची एरंडोल तालुका उपाध्यक्ष पदावरून फेर निवड करत जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदोन्नती करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी आयडी कार्ड व नियुक्ती पत्र उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष समाधान पाटील यांच्याहस्ते वाटप करुन सत्कार करण्यात आला.पत्रकार समाधान पाटील व स्वप्निल बोरसे यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे


No comments