जे टी महाजन पॉलिटेक्निक, मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत बक्षीस वितरण इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जे. टी मह...
जे टी महाजन पॉलिटेक्निक, मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत बक्षीस वितरण
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जे. टी महाजन पॉलीटेक्निक न्हावी मार्ग, फैजपूर येथे १ जानेवारी ते १५ जानेवारी या या कालावधीमध्ये ही कार्यशाळा संपन्न करण्यात आली होती. त्यादरम्यान "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबविण्यात आला होता. या कार्यशाळेमध्ये वाचन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक विजेतेपद मिळविले होते. त्या प्रित्यर्थ विद्यार्थ्यांना दि.२६ जानेवारी रोजी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेतील तीन उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. जे टी महाजन पॉलिटेक्निक मधील विद्यार्थी अनुक्रमे कुमारी वैभवी बढे, कुमारी तेजल बोरोले, युगांत नेहेते, वैभव बोरोले, कुमारी खुशबू तळले, यांना वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यशाळेच्या उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.पुस्तक वाचन केले तसेच पुस्तक परीक्षण व कथाकथन व त्यांना २६ जानेवारी २०२५ रोजी बक्षीस वितरण करण्यात आले. सदरील बक्षीस प्रमाणपत्र हे संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, प्राचार्य पी.एम. राणे तसेच प्राध्यापक व्ही. व्ही. बोरोले यांच्यामार्फत दिले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सेक्रेटरी विजय झोपे, सहसचिव शशिकांत चौधरी यांनी कौतुक केले. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रा. सोनाली फेगडे, प्रा.रूपाली चौधरी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments