Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा परिषद शाळा भवाळे येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

  जिल्हा परिषद शाळा भवाळे येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भवाळे, ता.  चोपडा__ : जिल्हा परिषद ...

 जिल्हा परिषद शाळा भवाळे येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भवाळे, ता.  चोपडा__ : जिल्हा परिषद शाळा भवाळे व धानोरा प्र. चो यांच्या संयुक्त विद्यमाने भवाळे येथे शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेस केंद्रप्रमुख श्री. पुरुषोत्तम सोनवणे अध्यक्षस्थानी होते, तर सरपंच श्री. आनंदराव पाटील आणि शिक्षणतज्ञ श्री. अंबादास सिसोदिया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. हातेड केंद्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी या परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. शाळेने तयार केलेली उत्कृष्ट पीपीटी परिषदेत सादर करण्यात आली.


शाळेतील शिक्षकांनी तयार केलेल्या नमुना क्रमांक एकच्या बायंडिंगचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. शिक्षणतज्ञ श्री. अंबादास सिसोदिया यांनी शाळा व शिक्षकांचे कौतुक करत शिक्षण प्रक्रियेसंबंधी अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले. त्यांचे विचार उपस्थित शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले. परिषदेस दुपारच्या सत्रात गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांनी भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक श्री. शैलेंद्र गुजर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर श्री. विशाल सनेर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता शितल राजपूत मॅडम यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रल्हाद पाटील ,श्री चंद्रकांत बाविस्कर, श्री शैलेंद्र गुजर श्री जितेंद्र सनेर, श्री विशाल सनेर, श्रीमती शितल राजपूत यांनी परिश्रम घेतले. ही शिक्षण परिषद भविष्यातील शिक्षणप्रक्रियेसाठी निश्चितच लाभदायक ठरेल, असे उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.

No comments