खान्देश सुपुत्र पोलिस अधीक्षक राखेचा यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवाद्याचा खात्मा ; एक कोटींचे बक्षीस असलेला चलपती 'यमसदनी' • चोपड...
खान्देश सुपुत्र पोलिस अधीक्षक राखेचा यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलवाद्याचा खात्मा ;
एक कोटींचे बक्षीस असलेला चलपती 'यमसदनी'
• चोपडा (लतीश जैन ) -:-
सविस्तर वृत्त असे की, छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक व शिंदखेड्याचे सुपुत्र निखिल राखेचा यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील कुलपाडा येथील जंगलात आणि ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील परिसरात ही चकमक झाली होती. गेल्या ३६ तासांपासून नक्षलवादी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक सुरू होती. खात्मा केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये जयराम उर्फ चलपती याचा समावेश आहे. तो सीपीआयच्या (माओवादी) केंद्रीय समितीचा सदस्य आहे. त्याला पकडण्यासाठी १ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. ठार झालेल्या अन्य नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यात दोन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.
कारवाईत दहा पथकांचा होता समावेश;-
या कारवाईत छत्तीसगड आणि ओडीसा पोलिसांची १० पथके सामील झाली होती. त्यात जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दल, छत्तीसगडमधील कोब्रा बटालियन तसेच ओडिसातील विशेष ऑपरेशन समूहाचा समावेश होता. ओडिसा, छत्तीसगडच्या सीमा भागात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले. देशात नक्षलवाद आता अखेरच्या घटका मोजत आहे. पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनी सांगितले की, चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, दारुगोळा, आयईडी जप्त करण्यात आले. मंगळवारी देखील सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू ठेवली होती.
शिंदखेडासह खान्देश वासीयांची मान गर्वाने ताठ
खान्देशातील सुपुत्र शिंदखेड्याच्या रहिवासी असलेला श्री राखेचा यांनी केलेल्या मोहिमेतील यशामुळे शिंदखेडा वासियांची तर खान्देशाची मान ताठ झाली असून आपल्या लेकरावर शिंदखेडा वासीय सह खान्देशातून हजारो चाहते जाम खुश आहेत. प्रसंगी संरक्षण मंत्री अमित शाह म्हणाले की, नक्षलवादापासून भारताला मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतील आणखी एक पुढचे पाऊल आम्ही टाकले आहे. नक्षलवाद्यांचा ज्या मुखीयावर छत्तीसगड सरकारने एक कोटीचे बक्षीस जाहीर केले होते, त्याचे नाव. जयराम उर्फ चलपती असे आहे. हा मावोवादी केंद्रीय यांच्या या कामगिरीचा सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे वडील अशोक श्रीकिसन राखेचा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments