रासेयो शिबीराच्या वतीने जलसाक्षरता व स्वच्छता मोहीम चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे ...
रासेयो शिबीराच्या वतीने जलसाक्षरता व स्वच्छता मोहीम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिर चहार्डी तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 23 जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून चहार्डी गावातील ग्रामस्थांना स्वच्छता व पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले.
तत्पूर्वी सकाळीं चहार्डी येथील ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांची जयंती साजरा करण्यात आली या प्रसंगी सरपंच चंद्रकलाताई पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन निलेश पाटील , ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कोळी, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.विशाल हौसे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.कुणाल गायकवाड, सौ.सुनिता पाटील डॉ. क्रांती क्षीरसागर, यतीन पटील रासेयो स्वयंसेवक व चहार्डी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. चहार्डी येथील ग्रामपंचायत कडून स्वयंसेवकांना गावातील जलसाक्षरता मोहीम राबवण्यासाठी नळांना बंद करण्यासाठी बंद बुच देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. विशाल हौसे यांनी स्वयंसेवकांना घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये पाण्याचे महत्व पटवून देण्याचे आवाहन केले. नंतर स्वयंसेवकांचे दहा ग्रुप करून दहा वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन स्वयंसेवकांनी 'पाणी आडवा पाणी जिरवा' 'जल है तो जीवन है' 'जल है तो कल है' 'प्रदूषण टाळा स्वच्छता राखा' 'सेव वॉटर सेव लाइफ' अशा विविध घोषणा देत स्वयंसेवकांनी गावातली ग्रामस्थांमध्ये पाण्याचे व स्वच्छतेचे महत्त्व याबाबत जनजागृती केली. चहार्डी येथील ग्रामपंचायत सदस्य, याप्रसंगी शा शी उमावि चे मुख्याध्यापक विजय सोनवणे सर,सचिन बाविस्कर व शिक्षक यांचे सहकार्य मिळाले.

No comments