ह .भ. प . रविकिरण. महाराज यांचे आडगाव ला जाहीर कीर्तन संपन्न...! चोपडा (प्रतिनिधी) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील आडगाव येथी...
ह .भ. प . रविकिरण. महाराज यांचे आडगाव ला जाहीर कीर्तन संपन्न...!
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील आडगाव येथील उतरानदेवी यात्रेनिमित्त तारीख १६ रोजी ह. भ .प. रविकिरण महाराज यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले हजारो श्रोते यावेळी उपस्थित होते.
आडगावचे ग्राम दैवत उत्तरान देवी जत्रा दिनांक १४ रोजी मकर संक्रांति निमित्त भरत असते. या पार्श्वभूमीवर पूर्वी फार वर्षांपूर्वी या यात्रेत महिला नर्तकींचा तमाशा होत होता परंतु नव्या पिढीने ही परंपरा आता मोडीत काढली असून, यंदा प्रथमच यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून ह भ प रविकिरण महाराज यांचे जाहीर कीर्तन ठेवले होते.
"आपला तो देव एक करुनी घ्यावा
तेणेविणे जीवा सुख नोहे..."या अभंगावर त्यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. आडगाव, तावसे बुद्रुक, नरवाडे वरती, विरवाडे, अंबाडे नारोद, खरग, नागलवाडी, बोर अजंती या व इतर पंचक्रोशीतील भाविक यावेळी हजर होते. अहिराणी मराठी भाषेत त्यांनी श्रोत्यांना मनमुराद हसविले. भजनी मंडळाचे त्यांना साथ संगत दिली .

No comments