Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अज्ञात मयताची ओळख पटविण्याचे सावदा पोलीस आवाहन

  अज्ञात मयताची ओळख पटविण्याचे सावदा पोलीस आवाहन  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:-हेमकांत गायकवाड) सावदा पोलीस स्टेशन ला दाखल अकस्म...

 अज्ञात मयताची ओळख पटविण्याचे सावदा पोलीस आवाहन 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

सावदा पोलीस स्टेशन ला दाखल अकस्मात मृत्यू रजि.नं.34/2024 दि.31/12/2024 अज्ञात बेवारस मयत यांचे परीवाराचा किंवा वारसांच्या ओळख पटविण्यासाठी भा.ना.सु.संहीता-2023 चे कलम 194 प्रमाणे सावदा पोलीस स्टेशन ला फिर्यादी सूरजकुमार गुप्तेश्वर प्रसाद रा. सावदा रेल्वे स्टेशन मास्तर ता.रावेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत अज्ञात पुरुष जातीचा वय अंदाजे 35 ते 40वर्षे ईसम नाव गाव माहीत नाही दि.30/12/2024 रोजी सायंकाळी 06.30 वा. चे पुर्वी वेळ निश्चित नाही. रोजी 22.55 वाजता रणगाव ते रायपुर ता. रावेर येथील रेल्वे रुळ खांबा क्र. 455/6 DSK- BSL जवळ. धावत्या रेल्वेची ठोस लागुन एका पुरष जातीच्या इसमाचा मृत्यू झाला असून  मयताच्या अंगात निळसर रंगाची जिन्स पैण्ट, चॉकलेटी रंगाची अंडरवेअर, निळ्या रंगाची सैण्डो बनियान, लाल पट्टी असलेला आकाशी रंगाचा T-Shirt अर्धवट निळ्या रंगाचे बाह्यांचा वस्त्रे परिधान केलेल्या मयत ईसम हा अंदाजे 35 ते 40 वर्षाचा पुरुष जातीचा असुन तो दिनांक-30/12/2024 रोजी सायंकाळी 06.30 वाजेच्या दरम्यान रणगाव ता. रावेर शिवारात खांबा क्र.455/6 डाउन रेल्वे क्र.11055 गोदान एक्सप्रेस ने ठोस लागुन मयत झालेला आहे तरी सदर मयत ईसमांचे वारसाचा शोध अद्याप पावेतो लागलेला नसुन तरी आपले पोलीस स्टेशन हद्दीत सदर मयत ईसमाचे नातेवाईक अगर वारस राहत असल्यास सावदा पोलीस स्टेशन शी संपर्क कराण्याचे आवाहन सावदा पोलीस स्टेशन चे सपोनि विशाल पाटील- पोउपनिरी/राहुल शिवाजी सानप यांनी केले आहे







No comments