adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून स्वतःसहित इतरांच्या जीवांचे रक्षण करावे -- प्रांताधिकारी श्री बबनराव काकडे

  वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून स्वतःसहित इतरांच्या जीवांचे रक्षण करावे -- प्रांताधिकारी श्री बबनराव काकडे इदू पिंजारी फैजपूर (संपा...

 वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून स्वतःसहित इतरांच्या जीवांचे रक्षण करावे -- प्रांताधिकारी श्री बबनराव काकडे


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 प्रत्येकाचे जीवन अनमोल असून सद्यस्थितीत रस्ता अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनधारकांनी सीट बेल्ट वापरावा, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नये, वाहनधारकाकडे वाहन चालवण्याचा परवाना असावा यासहित रात्रीचा प्रवास टाळून दारूच्या आहारी जाऊन वाहन चालवू नये असा मोलाचा सल्ला प्रांताधिकारी श्री बबनराव काकडे यांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री केतन किरंगे, वाहतुकीची जबाबदारी सांभाळणारे श्री रुस्तम तडवी, श्री सलीम तडवी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांच्यासहित कॅडेट्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि इंटरनल क्वालिटी अशुरंस सेल (आय क्यू ए सी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करू असे आश्र्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमसिंग राजपूत, वीरेंद्र जैन, रोहित महाजन, यश कोळी, यशवंत कोळी, रेहान सैय्यद, निलेश पाटील, विशाल श्रीखंडे, दीपक कोल्हे  यांनी परिश्रम घेतले.

No comments