चौगाव त्रिवेणी महादेव मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत विश्राम तेले चौगाव ता.चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चौगाव ता.चोपडा येथून...
चौगाव त्रिवेणी महादेव मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत
विश्राम तेले चौगाव ता.चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चौगाव ता.चोपडा येथून जवळच असलेल्या तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिराला तिर्थक्षेत्राचा "क" दर्जा मिळालेला असून या मंदिरा पासून जवळच जळगाव जिल्ह्यातील दुर्ग प्रकारातील एकमेव सुस्थितीत असणारा चौगावचा किल्ला आहे.तसेच जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा आहे.त्यामुळे या तिर्थक्षेत्रावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.पण त्रिवेणी महादेव मंदिराला तिर्थक्षेत्राचा क दर्जा मिळालेला असला तरी या ठिकाणी पर्यटकांना पिण्याचे शुद्ध पाणी, पर्यटकांसाठी निवास, रस्ता,पॅगोडा व निरीक्षणासाठी वाॅचटावर या सुविधा उपलब्ध नाहीत.या भागात मोठ्या प्रमाणात पशुपक्षी,वन्यप्राणी निसर्गसौंदर्य असले तरी सर्व मुलभूत सुविधांचा अभाव याठिकाणी आहे.तरी जिल्हा नियोजन मधून चौगाव ते त्रिवेणी संगम पर्यंत रस्ता व सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी चोपडा तालुक्यातून होत आहे.तसेच जिल्हा नियोजनच्या एकूण निधी पैकी तीन टक्के निधी गड किल्ल्यांवर खर्च केला जातो.त्यातून चौगाव किल्ल्यावरील गेल्या कित्येक वर्षांपासून पडलेले आई भवानीचे भव्य मंदिर उभारण्यात यावे अशी मागणी दुर्गप्रेमींकडून केली जात आहे.लोकप्रतिनीधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी चौगाव ग्रामस्थांकडून केली जात आहे.
No comments