-नायलॉन मांजा मुक्त मकर संक्रात.. त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) मकरसंक्रांत पतंग आणि महाराष्ट्र मध्ये अशी एक वेगळीच सांस्...
-नायलॉन मांजा मुक्त मकर संक्रात..
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
मकरसंक्रांत पतंग आणि महाराष्ट्र मध्ये अशी एक वेगळीच सांस्कृतिक उत्सावाची नाळ जुळलेली आहे परंतु या उत्सवाला गेल्या काही वर्षांमध्ये उत्साही पतंगप्रेमी नायलॉन मांजाच्या आहारी गेल्याने गालबोट लागत आहे. पशु पक्षांप्रमाणेच,नागरिकांच्या जीवावर बेतणारे प्रसंग नायलॉन मांजाने घडत आहेत.तरीही पतंग प्रेमींकडून नायलॉन मांजा वापर कमी होताना दिसत नाही पोलीस आयुक्तांनी नायलॉन माझ्यावर बंदी घातली असली तरीही शहरात विक्री आणि वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. नायलॉन मांजा मुक्त संक्रात पाळावी अशी पशुप्रेमी व नागरिकांकडून होते.
"प्रतिक्रिया"
जो कोणी नायलॉन मांजा विक्रेता विक्री करत असेल त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी नायलॉन मांजामुळे दरवर्षी पशु पक्षाप्रमाणेच नागरिकांनाही जीव गमवावा लागतो. त्यामुळे पतंगप्रेमींनी नायलॉन मांजा वापरू नये.
जयवंत हागोटे
भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी जिल्हा चिटणीस

No comments