मुस्तफाबाद प्रीमियर लीग: केजीएन फ्रुट्स विजेते चोपडा (प्रतिनिधी) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) शहरातील केजीएन कॉलनी भागात मुस्तफाबाद प्री...
मुस्तफाबाद प्रीमियर लीग: केजीएन फ्रुट्स विजेते
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
शहरातील केजीएन कॉलनी भागात मुस्तफाबाद प्रीमियर लीग ने बाजी मारली असून आज संघाच्या टेनिस बॉल टूर्नामेंट मधून केजीएन फ्रुट्स अंतिम विजेती ठरली आहे.
९ ते १२ जानेवारी यादरम्यान झालेल्या या क्रीडा प्रकारात टेनिस बॉल टूर्नामेंट मध्ये आठ संघांनी भाग घेतला. यात केजीएन फ्रुट्स अंतिम विजेता ठरला. या संघाला सोनेरी पदक व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. हमदान हार्डवेअर हा संघ उपविजेता ठरला. या क्रिकेट स्पर्धा मध्ये आठ क्रिकेट संघाने भाग घेतला विशेष म्हणजे ही स्पर्धा पहिल्यांदाच ऑनलाईन यूट्यूब चैनल वर दाखवण्यात आली घरी बसून अनेकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. सर्वोत्कृष्ट फलंदाज समीर पटेल, सर्वोत्कृष्ट गोलंदाज अश्फाक शेख, मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर मोहम्मद मुजाहिद सर्वोत्कृष्ट झे ल टिपणारे हरीप शेख सर्वोत्कृष्ट यष्टि रक्षक, उबेर अली साहिल तडवी यांनी या क्रिकेट स्पर्धेत मोलाची कामगिरी बजावली. तर सामना यशस्वीतेसाठी मोहम्मद मुजहिद (कप्तान), मुजिवली उप कप्तान, सांडू अली,मुजम्मिल शेख अल्ताफ अरब, फरदीन शेख, साबीर नदीम शेख, सुलतान शोएब हाफिज, नवीन खाटीक यांनी सहकार्य केले.

No comments