adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव येथे आयोजित “खान्देश रन” मॅरेथॉन स्पर्धेस; केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित....

  जळगाव येथे आयोजित “खान्देश रन” मॅरेथॉन स्पर्धेस; केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित.... जळगाव प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत ...

 जळगाव येथे आयोजित “खान्देश रन” मॅरेथॉन स्पर्धेस; केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित....



जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

जळगाव रनर्स गृप तर्फे आयोजित “खान्देश रन” मॅरेथॉन स्पर्धेस सागर पार्क,जळगांव येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या मॅरेथॉन स्पर्धेस केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह ईतर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. 

सदर “खान्देश रन” च्या ३/५/१०/२१ किलोमीटर स्पर्धेसाठी महाराष्ट्र तथा जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवला.जळगाव रनर्स गृपने या स्पर्धेचे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केले होते. यासाठी जळगाव रनर्स गृपचे अध्यक्ष किरण बच्छाव व त्यांच्या सर्व टीमचे केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी अभिनंद करून, विजेत्यांना बक्षीस वितरण केले.


यावेळी केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे व आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्यासह नाशिक विभागीय पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे,जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत,केदार बारबोले,जैन ईरिगेशनचे संचालक अथांग जैन,सुप्रिम पाईपचे सुरेश मंत्री,ऊद्योजक मनोज अडवाणी, राजेश चोरडिया यांची उपस्थिती होती.




No comments