चोपडा शहरात माता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा शहरात माता सावित्र...
चोपडा शहरात माता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरात माता सावित्री बाई फुले यांची जयंती बौद्ध समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.देशातील काण्या कोपऱ्यात महापुरुषांचे विचार पोहचवण्या साठी आंबेडकरी समाज अहोरात्र मेहनत घेत आहे कारण माणसाला श्वास घेण्या सोबत पूरोग्रामी महापुरुषांचे विचार काळाची गरज आहे श्वास माणसाचे शरीर जीवंत ठेवतो आणि महापुरुषांचे विचार माणसाला स्वाभिमानाने जगने शिकवतो याच ध्येयाने चोपडा शहर व ग्रामीण भागातील बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,देशातील महिलांना शिक्षणाचे दार उघडून देणारी क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रबोधन कार संजू सोनवणे यांनी उत्कृष्ठ माहिती सादर केली.तसेच,गोपाळराव सोनवणे दिवाणजी साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला नरेंद्र महाजन,शशीकांत पाटील,समाज कार्य करते समाधान सपकाळे,आर.बि.सोनवणे,रवींद्र वाडे,अक्षय शिरोडकर,शेरा वानखेडे,वसंजी शिंदे,गंगाधर सावते,सुभाष बाविस्कर,प्रविण शेंगदाणे,प्रविण करणकाळे,निळे निशाण संघटनेचे पदाधिकारी अनिता कैलास बावीस्कर, बबिता बाविस्कार, दिपक बाविस्कर,बहुजन समाज पार्टी चे पदाधिकारी सचिन बाविस्कर,बावीस्कर दादा व चोपडा शहर व ग्रामीण भागातील समाज बांधव व बघिनी उपस्थित होते
No comments