रावेर पोलीसांची वाळू तस्करांवर कारवाई ५ वाहने केली जप्त रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यात दररोज अ...
रावेर पोलीसांची वाळू तस्करांवर कारवाई
५ वाहने केली जप्त
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यात दररोज अवैध गौण खनिज उत्खनन व अवैध गौण खनिज वाळू तस्करी करणाऱ्या ५वाहनांवर रावेर पोलीसांनी कठोर कारवाई करत पाच वाहने जप्त केली या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रावेर तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या पाल मंडळ व खानापूर मंडळात रावेर पोलीस स्टेशनचे हद्दीत रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जैसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली रावेर पोलीसांच्या सतत कारवायांमुळे अवैध गौण खनिज वाळू माफिया धडकी भरली आहे रावेर तालुक्यातील नदीपात्रातील रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या तसेच दैनिक वर्तमानपत्रात ही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यासर्व तक्रारींची गंभीर दखल रावेर पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांनी गस्ती पथक नेमून रात्रीच्या वेळी विशेष मोहीम राबवून. अवैध वाळू वाहतूक करणाऱे ४ ट्रॅक्टर आणि एक अशोका लैलेंड आयशर अशी मिळून ५वाहने जप्त करण्यात आली आहेत.
रावेर पोलिसांच्या ठोस धडक कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन व वाहतूकीमुळे पर्यावरणाचा र्हास होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या या कारवाई ने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे रावेर पोलिसांचे हे पाऊल तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रभावी व परिणामकारक ठरणार असल्याची आशा पर्यावरण प्रेमीकडून व्यक्त करण्यात येत आहे
( डॉ विशाल जैसवाल- रावेर पोलीस निरीक्षक रावेर पोलीस स्टेशनचे हद्दीत विनापरवाना अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने व वाळू माफिया यांनी अवैध वाळू ,गौण खनिज वाहतूक करतांना कोणत्याही परवाना अथवा परवानगी नसल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल)

No comments