मोटार सायकल चोरीतील आरोपीस २४ तासात अटक. अमळनेर प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील पथकास अमळनेर पो.स्टे.ल...
मोटार सायकल चोरीतील आरोपीस २४ तासात अटक.
अमळनेर प्रतिनिधी(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील पथकास अमळनेर पो.स्टे.ला गुरनं ०९/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२) या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल ही नाना भिल रा. ढेकु ता. अमळनेर हा वापरत असल्याची बातमी मिळाल्याने अमळनेर तालुक्यातील ढेकु गावातील नाना भिल यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर उर्फ नाना भगवान पवार (भिल), वय ४०, रा.ढेकु सिम ता.अमळनेर असे सांगीतल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस करुन त्याचे कडून २००००/- रु. कि.ची मोटार सायकल जप्त करून त्यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी अमळनेर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.अमळनेर पो.स्टे.ला गुरनं ०९/२०२५ भा.न्या.सं.३०३(२) प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा.श्री. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांनी केली आहे.

No comments