adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

६४ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात चोपडा येथील कलाकृती ची निवड

  ६४ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात चोपडा येथील कलाकृती ची निवड चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड)   भगिनी मंडळ, चोपडा संचालित,...

 ६४ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात चोपडा येथील कलाकृती ची निवड


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 भगिनी मंडळ, चोपडा संचालित,ललित कला केंद्र, चोपडा येथील कला संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित ६४ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात चार कलाकृतींची निवड करण्यात आली. यामध्ये पायाभूत वर्गातून प्रमोद महेश वारुळे - नगाव ता. पारोळा याची दोन चित्रे एक स्मरण चित्र व एक वस्तू चित्र तर ए.टी.डी. प्रथम वर्ष वर्गातून माळी युवराज पुनमचंद, साकळी ता. यावल याचे दुर्मिच द्विमित्त संकल्प  हे चित्र तर मोहिनी हीरालाल जाधव बबळाज ता.शिरपुर हिचे वस्तू चित्र असे एकूण चार चित्र निवड करण्यात आली.

यावर्षी सदरचे हे प्रदर्शन नागपूर येथील शासकीय कला महाविद्यालय, लक्ष्मी नगर,दीक्षा भूमी जवळ,नागपुर येथे आयोजित करण्यात आले असून हे दिनांक १० जानेवारी ते १७  जानेवारी २०२५ पर्यंत हे सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातून जवळपास ४०० कलाकृती आल्या आहेत. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे ललित कला केंद्राचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनम गुजराथी व सर्व पदाधिकाऱ्यांनी  कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

No comments