डीजे मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजाने वाजविणाऱ्यांवर कारवाई होणार - डॉ विशाल जयसवाल रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) ...
डीजे मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजाने वाजविणाऱ्यांवर कारवाई होणार - डॉ विशाल जयसवाल
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
लग्न समारंभ तसेच आगामी सण उत्सव काळात आयोजित मिरवणुकीत मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविले तर कारवाई केली जाईल शासनाच्या नियमानुसार डीजे चा लग्न समारंभात तसेच सण उत्सव मिरवणुकांमध्ये डीजे वाद्यांचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेवला जात असल्याने शासनाच्या आदेशाचा नियमभंग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा नियम भंग करणारे लग्न समारंभ,सण उत्सव मिरवणुकां आयोजकांविरुद्ध कायदेशीर कठोर कारवाईसह गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी रावेर येथील सण उत्सव लग्न समारंभ आदी पार्श्वभूमीवर शांतता समिती बैठकी दरम्यान दिला
आगामी लग्न समारंभ, सणउत्सव धार्मिक कार्यक्रम नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करीत शांततेने साजरे करावेत. शक्यतो डीजेचा कर्कश आवाज टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुन ध्वनिप्रदूषण कमी कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत असे पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल यांनी उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांना केले. बैठकीत शहारातील वाहतूक कोंडी सीसीटीव्ही अतिक्रमण अशा अनेक विषयांबाबत प्रश्न उपस्थित होऊन चर्चा करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयसवाल सपोनि अंकुश जाधव हरीश गनवाणी, सी एस पाटील, दिलीप कांबळे, दिलीप पाटील, गयासुद्दिन काझी, शैलेश अग्रवाल, राजेश शिंदे, शरद राजपूत, अरुण शिंदे, बाळू शिरतुरे, ज्ञानेश्वर महाजन, सादिक शेख यांच्यासह शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

No comments