नांदगाव कोहोळी घाटातील रस्त्यावरील संरक्षक भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे... त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) रस्ता खचू ...
नांदगाव कोहोळी घाटातील रस्त्यावरील संरक्षक भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे...
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
रस्ता खचू नये म्हणून रस्त्याच्या कडेला घाटामध्ये संरक्षक भिंती बांधल्या जातात. त्यातच त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये नांदगाव कोहोळी या घाटामध्ये संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या आहेत. या रस्त्यावरील संरक्षक भिंतींचे बांधकाम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे या बांधकामासाठी वापरण्यात आलेले मटेरियल माती मिश्र वाळू वापरण्यात आलेली आहे हे काम चांगल्या दर्जाचे नसून संरक्षण भिंतीमध्ये मोठ मोठाल्या दगडी गोटे टाकण्यात आलेले आहेत या भिंती लवकरच कुमकवत होतील हे काम एस्टिमेट नुसार झालेले नासून या संरक्षक भिंतीची पाहणी करून संबंधित कंत्राटदारवर कार्यवाही करण्यात यावी अशी गावातील नागरिकांकडून मागणी होत आहे जर कंत्राटदारावर कार्यवाही झाली नाही तर गावातील नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल.
,,प्रतिक्रिया,,
सदर या संरक्षक भिंतीचे बांधकाम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे या संरक्षक भिंतीमध्ये मोठ मोठ्या दगडी,गोटे टाकण्यात आलेले आहेत व या भिंतींना पाणी मारले जात नाही तरी संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी.
जयवंत हागोटे भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नाशिक जिल्हा चिटणीस


No comments