adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ कोमल तायडे युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित

  सौ कोमल तायडे युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक-:- हेमकांत गायकवाड) मलकापूर-: उद्योग व रोजगार निर्मिती क्षेत...

 सौ कोमल तायडे युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर-: उद्योग व रोजगार निर्मिती क्षेत्रातील सक्रिय योगदानाबद्दल स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या वतीने एस के इंटरप्रायजेस् कंपनीच्या संचालिका सौ कोमल तायडे यांना युवा उद्योजक पुरस्कार २०२४-२५ देऊन सन्मानित करण्यात आले.  

 आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत पत्रकार दिनानिमित्त येथील क्रीडा संघटना स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर यांच्यावतीने समाजातील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन दि. ०७ जानेवारी रोजी करण्यात आले. 

तालुका क्रीडा संकुल मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वसंतराव शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून आ. चैनसुख संचेती, तहसीलदार राहुल तायडे, भरतशेठ दंड, राजेश महाजन, ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, रेल्वे पोलिस उपनिरीक्षक जसबिर राणा, इंजी.कोमल तायडे, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मी शंकर यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

     खेळ व खेळाडूंना सेवा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या माध्यमातून पत्रकार आद्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी आयोजित सत्कार समारंभामध्ये उद्योजक व रोजगार क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एस के इंटरप्रायजेस् कंपनीच्या संचालिका सौ कोमल तायडे यांना युवा उद्योजक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ कोमल तायडे यांनी सांगितले की आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील होतकरू व गरजवंत युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी झाला तर एक स्वावलंबी समाज निर्माण होऊशकतो ही सावित्रीबाईंची शिकवण डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य करीत राहणार असल्याचे सांगितले.

    यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष प्रा डॉ नितीन भुजबळ, सचिव विजय पळसकर, राजेश्वर खंगार, गुरूदत्त यादव यांच्यासह अनेकांचे योगदान राहिले.स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या वतीने माझ्या उद्योग व रोजगार क्षेत्रातील सक्रिय योगदानाची दखल घेत संघटनेच्या वतीने मला "युवा उद्योजिका पुरस्कार २०२०२४-२५" देऊन माझा उत्साह आणखीन वाढविला आहे.

   या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढलेली असून भविष्यात युवकांना उद्योग, व्यवसाय व कायम स्वरुपी रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. इंजी सौ कोमल तायडे संचालिका, एस के इंटरप्रायजेस्

No comments