हिंगोणा येथील श्री शब्बीर खान यांची जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड यावल (प्रतिनिधी ) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) दिनांक २२/०१/२०२५ ...
हिंगोणा येथील श्री शब्बीर खान यांची जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड
यावल (प्रतिनिधी )
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दिनांक २२/०१/२०२५ रोजी यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय येथे भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची नुकतीच बैठक संस्थापक अध्यक्ष अय्युबजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी शब्बीर खान सरवर खान यांची निवड करण्यात आली . तर जिल्हाध्यक्ष पदी हर्षल अंबेकर यांची निवड करण्यात आली यावल तालुकाध्यक्ष फिरोज तडवी तर उपाध्यक्ष अशोक तायडे, एटी चौधरी यांना यावल तालुका कार्याध्यक्ष पद देऊन नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जीवन चौधरी होते तर प्रास्ताविक रणजित भालेराव यांनी केले कार्यक्रमाला यावल तालुक्यातील पत्रकार जीवन चौधरी .ए टी चौधरी दहिगाव, मिलींद जंजाळे, राजू पिंजारी साकळी, अशोक तायडे ,बाळासाहेब आढाळे, रवींद्र आढाळे डोंगर कठोरा फिरोज तडवी महेलखेडी इम्रान पिंजारी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते

No comments