चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयातर्फे पर्यावरण संवर्धन व वणवा जनजागृती अभियान गलंगी प्रतिनिधी मच्छिंद्र रायसिंग (संपादक -:- हेमकांत गायक...
चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयातर्फे पर्यावरण संवर्धन व वणवा जनजागृती अभियान
गलंगी प्रतिनिधी मच्छिंद्र रायसिंग
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव,सहाय्यक वनसंरक्षक चोपडा,यावल वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वैजापूर वनक्षेत्रातील,मौजे वैजापूर येथे पर्यावरण संवर्धन व जन जागृती अभियानाची आज सुरवात करण्यात आली याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्राध्यापक नारसिंग वळवी शेनपाणी क्षेत्र कार्य प्रमुख डॉ.विनोद रायपुरे,वैजापूर गावाचे सरपंच दत्ता पावरा,उपसरपंच विद्याताई बारेला,वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी बि.के.थोरात,बिलारसिंग बारेला,वनपाल विजय शिरसाठ,सुखदेव बारेला,शिवराम बारेला,दीपक भोई,संदीप ठाकरे,कुबेर तडवी,समीर तडवी,बाळू बारेला, व समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या मदतीने अभियान राबविण्यात आले.यात वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांनी वणवा प्रतिबंध साठी गावात जागृती,आगीमुळे होणारे जंगलाचे नुकसान व जैवविविधतेत होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली.तसेच विद्यार्थी मार्फत शेनपाणी,मुळ्याउतार,गावात जाऊन वणवा प्रतिबंधक जनजागृती करण्यात येणार आहेत.

No comments