अडावद गावात व्हॅनच्या धडकेत एका चिमुरडीचा झाला अपघात चोपडा प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अडावद.गाव आणि परिसरातून चोप...
अडावद गावात व्हॅनच्या धडकेत एका चिमुरडीचा झाला अपघात
चोपडा प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अडावद.गाव आणि परिसरातून चोपडा येथे विद्यालयातील विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या कमळगाव येथील भाडे तत्वावरील व्हॅनने प्रियांशी या दीड वर्षांच्या चिमुकलीला चिरडले. शुक्रवारी दुपारी १ वाजता गावातील भरवस्तीत हा अपघात झाला. या प्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमळगाव येथील व्हॅन क्रमांक एमएच ३९ जे ७४२४ वरील चालक पंकज अरुण धनगर वय ३० हा अडावद, कमळगाव आणि परिसरातील काही गावांमधील विद्यार्थ्यांना चोपडा येथील शाळे ने आण करतो. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तो ग्रामपंचायतीकडून चांग्यानीमकडे भरधाव वेगाने जात होता.
त्यावेळी रस्ता ओलांडून आपल्या आईकडे जात असलेल्या प्रियांशी या दीड वर्षाच्या बालिकेला त्याने चिरडले. या अपघात चिमुरडी जागेवरच गतप्राण झाली. आई आणि वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडी चिरडली गेल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन सुशिर यांनी प्रियांशीला मृत घोषीत केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चोपडा उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. तपास हवालदार भरत नाईक करीत आहे

No comments