adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा आगारात इंधन बचत अभियानाचे उद्घाटन

  चोपडा आगारात इंधन बचत अभियानाचे उद्घाटन  चोपडा ( प्रतिनिधी)  (संपादक-:- हेमकांत गायकवाड) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात दिनांक १६ ...

 चोपडा आगारात इंधन बचत अभियानाचे उद्घाटन 


चोपडा ( प्रतिनिधी) 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात दिनांक १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणाऱ्या इंधन बचत मासिक अभियानाचे उद्घाटन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.कार्यक्रमासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निर्देशक संभाजी क्षिरसागर, अनिल चव्हाण, पत्रकार छोटु वारडे उपस्थित होते.संभाजी क्षिरसागर यांनी इंधन वाचविण्यासाठी चालकांनी घ्यावायची काळजी इंधन बचतीचे महत्त्व या बाबत चालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी चांगले के पी टी एल आणणारे चालकांचा सत्कार आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भगवान नायदे यांनी केले.याप्रसंगी स का अ सिध्दार्थ चंदनकर वाहतुक निरीक्षक सागर सावंत लेखाकार ईश्वर चौधरी अनिल बाविस्कर,संदिप पाटील, नरेंद्र जोशी चंद्रभान रायसिंग रिना पाटील सविता कोळी राजश्री, परदेशी सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments