फैजपूर शहरासाठी नविन ग्रामीण रुग्णालय मंजुरी साठी आमदार अमोल जावळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत दादा पवार गटाकडून निवेदन निवेदन ...
फैजपूर शहरासाठी नविन ग्रामीण रुग्णालय मंजुरी साठी आमदार अमोल जावळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत दादा पवार गटाकडून निवेदन
निवेदन देताना माजी उनगराध्यक्ष कुर्बान शेख अशोक भालेराव नासीर शेख करीम भुपेंद्र सोनवणे अख्तरपहेलवान
शे निसार गफ्फार कुरेशी जलीलखान अस्लमखान आदी मान्यवर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
आमदार अमोल दादा हरीभाऊ जावळे यांना फैजपूर न पा चे माजी उपनगराध्यक्ष शे कुरबान शे करीम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत दादा पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष शे नाशिर हुसेन हाजी करीम व अशोकजी भालेराव साहेब यावल तालुका उपाध्यक्ष अजीत दादा पवार गट ,यांनी हार्दिक शुभेच्छा देवून फैजपूर शहरासाठी शासकिय ग्रामीण रुग्णालयाचे मागणी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंजीत दादा पवार गटा तर्फे निवेदन देऊन विनंती केली की, फैजपूर शहरासाठी शासकीय रुग्णालय नाही नगरपरिषद फैजपूर येथील रुग्णालयात प्रसूती विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे प्रसूती विभाग बंद पडलेला आहे. फैजपूर शहरातील व इतर आजूबाजूच्या परिसरातील महिलांना प्रसूती करीता भटकंती करावी लागते. दलित, मजूर, अल्पसंख्यांक, आदिवासी या सर्व गोर गरिब महिलांना प्रसूती करीता खाजगी रुग्णालयाचा खर्च पेलवला जात नाही, रात्री अपरात्री खाजगी रुग्णालयातील डॉक्टरची फी आवाक्याबाहेरची असते. या सर्व सामान्य महिलांना असा अवाढव्य खर्चाकरीता ऐन वेळी तारांबळ उडते. तरी फैजपूर शहराकरिता ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यास आपल्या लाडक्या बहिणींना प्रसूती विभागाची २४ तास सेवा उपलब्ध होईल. तसेच इतर रुग्णांना आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येणारी औषधी, लहान मोठ्या शत्रक्रिया सुविधा, तसेच एक्स रे मशीन ची सुविधा सुद्धा मिळू शकेल. यासाठी शासनाकडे फैजपूर शहरासाठी न.पा.हद्दीबाहेरील सरकारी बखळ जागा गट नं.२१२ क्षेत्र ५:१५:१२ आर जागा हस्तांतरित करणेसाठी व त्यावर ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुग्णालयाकरीताचा शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे तरी सदर रुग्णालय मंजूर होणेसाठीचा प्रलंबित असलेला प्रस्तावास आमदार साहेब व्यक्तिश: लक्ष घालून शासनाकडे पाठपुरावा करून फैजपूर शहरासाठी नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर होईल अशी आमदार अमोल दादा जावळे यांना विनंती केली आहे.
No comments