निसर्गरम्य पर्यटन स्थळ गारबर्डी धरणाची वाट बिकट दीड ते दोन किलोमीटर चा करावा लागतोय खडतर प्रवास, संबंधित विभागाचे दुर्लक्ष पाल गारबर्डी ...
निसर्गरम्य पर्यटन स्थळ गारबर्डी धरणाची वाट बिकट
दीड ते दोन किलोमीटर चा करावा लागतोय खडतर प्रवास, संबंधित विभागाचे दुर्लक्ष 
पाल गारबर्डी धरण रस्त्यावर पायी चालत असताना समस्यांना सामोरे जात पत्रकार मुबारक तडवी यांनी टिपलेले दृश्य
रावेर तालुका प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
रावेर :-तालुक्यातील पाल हे पर्यटनस्थळ थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रकाशझोतात आहे. प्रामुख्याने पाल गार्डन,प्राणीसंग्रहालय ,हरिण पैदास केंद्र ए हट झूलता पुल यासह अनेक प्रकल्प या पर्यटन स्थळात समावेश आहे. यामध्ये विशेष भर पडली ती म्हणजे सातपुडा पर्वताच्या रांगेतील जंगल भ्रमंती म्हणून वनविभागाचे वतीने पर्यटकांना पर्यटन दर्शन घडवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जंगल सफारी हे विशेष स्तुत्य आनंददायी मनमोहक आकर्षक उपक्रम ठरत आहे
यासोबतच भर पडते ती नयनरम्य गारबर्डी धरण, या धरणातील पाण्याचे मनमोहक दृश्य ,सुंदर परिसर ,सदैव होत असलेली मित्र मंडळी कुटूंबीय पर्यटकांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात होत असते. पण याच नयनरम्य गारबर्डी धरणावर जाणाऱ्या दिड ते दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची वाट अतिशय बिकट, खडतर व वेदनादायी ठरत असल्यामुळे पर्यटकांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे
आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाल महामार्ग ते गारबर्डी धरण या अंदाजे दिड ते दोन किलोमीटर रस्त्यावर खड्डे च खड्डे पडलेले असून या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. टू व्हीलर वाहनावरुन जाणे तर सोडाच पायी चालणेही जिकरीचे झाले आहे. तसेच धरण लगत असलेल्या गाव पाडा वस्तीत रहीवांशाना ही हाच पर्यायी मार्ग असून दैनंदिन जीवनातील रहदारीचा येथील रहीवाशी आदिवासी बांधवांना ही या समस्येला सामोरे जावे लागत आहे तरी संबंधित विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.हा रस्त्याची जागा वनविभागाने जलसंपदा विभाग, धरण प्रशासन यांच्याकडे वर्ग आहे असे समजते.शासन पाल पर्यटन स्थळी पर्यटकांची संख्या वाढीसाठी एकना अनेक प्रयत्न करीत आहे. कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देत आहे.नेत्रदिपक सौंदर्य, नयनरम्य दृश्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील आहेच यात दुमत नाही .परंतु गारबर्डी धरणाची वाट व धरण परिसरातील विश्रामगृहाची अवस्था बिकट झाली आहे. या पर्यटन स्थळ निसर्गरम्य गारबर्डी धरण परिसरात सौंदर्यीकरण ,सोयी सुविधा निर्माण करणे व पर्यटकांना उपलब्ध करून आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे.
तरी गारबर्डी धरण दीड ते दोन किलोमीटर रस्त्यावर चांगले व उत्कृष्ट सामग्री वापरुन डांबरीकरण करण्यात यावे व नवीन रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी गारबर्डी धरण परिसरातील पाण्यावरील रहिवासी कुटुंब व पर्यटकांसह पर्यावरण प्रेमी तसेच सुज्ञ नागरिकांनी केली आहे.


No comments