adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नुकसान ग्रस्त शेतकरी, नागरिकांना भरपाई मिळावी रावेर तहसीलदार यांना दिले निवेदन

  नुकसान ग्रस्त शेतकरी, नागरिकांना भरपाई मिळावी रावेर तहसीलदार यांना दिले निवेदन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक-:- हेमकांत गायकवाड) धा...

 नुकसान ग्रस्त शेतकरी, नागरिकांना भरपाई मिळावी रावेर तहसीलदार यांना दिले निवेदन


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

धामोडी, कोळदा, सुलवाडी येथे जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची  भरपाई तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी यासाठी मा. तहसीलदार बी. ए. कापसे साहेब यांना शेतकरी नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. रावेर तालुक्यातील धामोडी, सुलवाडी, कोळदा या भागात २०२१ मध्ये चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, नागरीकांना तात्काळ मदत द्यावी ही विनंती शेतकरी, नागरिकांच्या वतीने करण्यात आली. रावेर तालुक्यात वारंवार अतिवृष्टी व चक्रीवादळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. व त्यांच्या उभ्या पिकाची अपरिमित हानी होत आहे. साधारणतः दरवर्षीच शेतकऱ्यांना अशा संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी मोडून पडण्याची शक्यता आहे..

रावेर तालुक्यात दि. जुलै २०२१ रोजी ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने नद्यांना मोठा पूर आला होता. यात चक्रीवादळमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर पाणी घरात घुसून अतोनात नुकसान झालेले होते. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले असता तहसीलदार साहेब यांनी आश्वासन दिले येत्या काही दिवसात सर्व नुकसान ग्रस्थांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. निवेदन देते वेळी उपस्थिती धामोडी ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील, सरपंच कोळदा, युवासेना तालुका उपाध्यक्ष दिपक जैन, गणेश महाजन उपस्थित होते.

No comments