प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षित सेवा करणाऱ्या एस. टी. चालकांचा सत्कार [ सरदार अजिज पटेल बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम] चोपडा:-प्रतिनीधी (...
प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरक्षित सेवा करणाऱ्या एस. टी. चालकांचा सत्कार
[ सरदार अजिज पटेल बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम]
चोपडा:-प्रतिनीधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील एस.टी. आगारातील १० वर्षे ,१५ वर्षे व २५ वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार सरदार अजिज पटेल बहुउद्देशीय संस्थेकडून सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सलमान अब्दुल पटेल, सचिव श्रीमती नर्गिस पटेल, मार्गदर्शक अब्दुल सरदार पटेल, मुस्ताक पटेल व आगारातील सर्व अधिकारी, वाहक, चालक व कर्मचारी उपस्थित होते. २५ वर्षे सुरक्षित सेवा झाली एकही अपघात त्यांच्या हाताने झालेला नाही ही अभिनंदनीय बाब असल्याचे अब्दुल पटेल सर यांनी याप्रसंगी सांगितले. ध्वजारोहणा नंतर लगेच कार्यक्रम संपन्न झाला.


No comments