नगरपालिकेच्या आश्वासनानंतर उपोषण तूर्त स्थगितीत फैजपूर मुलभूत सुविधांसाठीचे २६ जानेवारी पासून करणार होते आमरण उपोषण इदू पिंजारी फैजपूर (सं...
नगरपालिकेच्या आश्वासनानंतर उपोषण तूर्त स्थगितीत
फैजपूर मुलभूत सुविधांसाठीचे २६ जानेवारी पासून करणार होते आमरण उपोषण
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपालिकेच्या मूलभूत नागरी सुविधा शहरवासियांना मिळण्यापासून वर्षानुवर्षे दुरापास्त झाल्या होत्या याबाबतीत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रामराज्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोजी नगरपालिका समोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करून सदर समस्या निवाराणार्थ एक महिन्याचा अवधी दिला होता त्या नुसार मुख्याधिकारी यांनी उशिरा पण दखल घेत जा. क्र./ सा. प्र.- आस्था /१२६३ प्रमाणे लेखी हमी दिनांक २४ जाने. प्राप्त झाली असल्याने सदर उपोषण तूर्त पुढे करीत असल्याचे संस्थाध्यक्ष संजय सराफ यांनी कळविले आहे
मात्र सदर समस्यांबाबत काही निर्णय अद्याप ही अमलात येण्यास दुर्लक्षित विलंब होत आहेच राष्ट्र पुरुषांची (पुतळ्यांची ) प्रतिमांचे नियमित स्वछता व माल्यार्पण होणे, आठवडे बाजारात शेतकरी वर्गासाठी राखीव जागा उपलब्धी ,नियमित स्वछता, साचलेले गटार व सांडपाणी वर जंतू नाशक पावडर फवारणी होणे, पाणी पुरवठा बंद भोंगा,बंद पथदिवे सदर ह्या विषयावर आपण तात्काळ निर्णय अंमलबजावणी करीत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करावा ही रास्त अपेक्षा! रामराज्य सेवाभावी संस्था संचालक सदस्य उपोषण कर्त्यांनी व्यक्त केली आहे
No comments