दोंडाईच्यात शिवरत्न जिवा महाला यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मोटरसायकल रॅली, व अभिवादन कार्यक्रम संपन्न.... दोंडाईचा- (प्रतिनिधी.) (संपादक ...
दोंडाईच्यात शिवरत्न जिवा महाला यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मोटरसायकल रॅली, व अभिवादन कार्यक्रम संपन्न....
दोंडाईचा- (प्रतिनिधी.)
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
प्रताप गडाच्या रणसंग्रामात जिवाची बाजी लावणारे शूर शिलेदार जिवा महाला यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जिवा महाला यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नाभिक समाज युवक मंडळाच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते.
दरम्यान सदर मोटारसायकल रॅली ही डी आर हायस्कूल, गुरव स्टॉप, आझाद चौक पिंपळ चौक, गणपती मंदिर, संतोष माता मंदीर, नुतन कॉलेज, नंदुरबार चौफुली, शिव स्मारक मार्ग राजपथ वरून मानराज गल्ली, राम मंदिर येथुन मार्गक्रम केले. दरम्यान सदर मोटरसायकल रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. सदर रॅली ही दादासाहेब रावल स्टेडियम येथे समाप्ती करण्यात आली. दादासाहेब रावल हॉल येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. व समाजातील १४ वर्षांपासून शिव जयंती उत्सव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज बनण्याचा बहूमान मिळवणारे राकेश चित्ते यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसचे नुकतीच खान्देश मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी पदी समाधान ठाकरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा देखील नाभिक समाजाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यासह आदी मान्यवरांचा सत्कार याठिकाणी संपन्न झाले. या कार्यक्रमाला नाभिक दुकानावर संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, तालुकाध्यक्ष रवींद्र चित्ते, शहराध्यक्ष दिलीप सैंदाणे, दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष अनिल ईशी, युवक मंडळाचे शहराध्यक्ष राजेश मिस्तरी, महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिनिधी बन्सीलाल चित्ते, मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश मिस्तरी, समाधान ठाकरे, मुकेश चित्ते, जगदीश ईशी, गुलाब पवार, संदीप पवार, अनिल चित्ते, नितीन सूर्यवंशी, याच अधिक युवक मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले..
सदर कार्यक्रमास माजी शहराध्यक्ष छोटू महाले, राजेंद्र मोरे, अशोक सोनवणे, महेंद्र चित्ते, रमेश मोरे, गोकुळ सैंदाणे, केंद्र भदाणे, छोटू चित्ते, राकेश चित्ते, गोपाल बोरसे, गणेश पवार, किरण सूर्यवंशी, विशाल महाले, नंदू मोरे रमेश खोंडे, कैलास चित्ते, भूषण अहिरे, मच्छिंद्र पवार, योगेश सूर्यवंशी, भूषण सोनवणे, अर्जुन चित्ते, प्रशांत पवार, दीपक सैंदाणे, शरद वरसाळे, चेतन महाले, अमोल बोरसे, जयेश वसाने, जयेश पवार, प्रशांत सैंदाणे, भरत वरसाळे, राजेंद्र सोलंकी यांच्यासह समाजातील विविध संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी व सदस्य नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

No comments