adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा महाविदयालयात 'नवीन शैक्षणिक धोरण: स्कूल कनेक्ट २.०' या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

  चोपडा महाविदयालयात 'नवीन शैक्षणिक धोरण: स्कूल कनेक्ट २.०' या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवा...

 चोपडा महाविदयालयात 'नवीन शैक्षणिक धोरण: स्कूल कनेक्ट २.०' या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन


चोपडा प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा :  महाराष्ट्र शासन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविदयालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: २०२० स्कूल कनेक्ट २.० या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता ९वी व १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख म्हणून उपप्राचार्य तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. के. एन. सोनवणे,  श्री. संजय सोनवणे, श्री. एम. एस.पाटील, डॉ.एम.एल.भुसारे व श्री. चेतन बाविस्कर आदि उपस्थित


     यावेळी मार्गदर्शक उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे यांनी 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:२०२० मधील विदयार्थ्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमात झालेले नाविन्यपूर्ण बदल' या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विदयार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी प्राप्त होईल.विद्यार्थ्यांना यातून रोजगाराभिमुख शिक्षण प्राप्त होईल. त्यासाठी शासनाने विविध आर्थिक सहाय्यता योजना सुरु केल्या आहेत. या धोरणानुसार पाठ्यक्रमात झालेला बदल विदयार्थ्यांना विविध ज्ञानशाखांची ओळख व  ज्ञान प्राप्त करून देण्यास महत्वपूर्ण ठरेल यात शंका नाही'.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. संजय सोनवणे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी.डी.कर्दपवार व अनिल पाटील यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

No comments