न्हावी येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे दि. १५ जानेवारी बुधवारपासून आयोजन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) न्हावी येथील श...
न्हावी येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे दि. १५ जानेवारी बुधवारपासून आयोजन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील श्री स्वामिनारायण मंदिराजवळ संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन दि. १५ जानेवारी ते दि.२१ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. कथेचे वक्ता प.पू .शास्त्री श्रीभक्तीस्वरूपदासजी आहेत. हा संगीतमय श्रीमद् भागवत सप्ताह अ.नि. रोहिदास गणपत भोगे व अ. नि. नलिनी रोहिदास भोगे यांच्या मोक्षार्थ आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे यजमानपद श्रीमती सुनीता हेमचंद्र भोगे, राहुल हेमचंद्र भोगे, भूषण हेमचंद्र व भोगे परिवार आहे. कथेची वेळ दुपारी दोन ते संध्याकाळी सहा तीस अशी राहणार आहे. कथेची रूपरेषा पुढील प्रमाणे- दि.१५ जानेवारी रोजी कथा प्रारंभ ( गोकर्ण कथा शुकदेवजी परीक्षित मिलन ),दि.१६ जानेवारी रोजी ध्रुव चरित्र, दि.१७ जानेवारी रोजी प्रल्हाद चरित्र ( नृसिंह प्रागट्य) वामन जन्म बळी यज्ञ ), दि. १८ जानेवारी रोजी राम जन्म व कृष्ण जन्म,दि.१९ जानेवारी रोजी शिव आगमन - दधिमंथन - गोपाळकाला, दि.२० जानेवारी रोजी रासोत्सव रुक्मिणी विवाह,दि.२१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १२ सुदामा पोहे व कथा समाप्ती, महाप्रसाद दुपारी बारा वाजता कथा समाप्तीनंतर, संध्याकाळी पाच ते सात नगर यात्रा असा कार्यक्रम आहे.संहिता पाठ वक्ता म्हणून प.पू.शास्त्री अनंतप्रकाशदासजी आहेत. परिसरातील सर्व संत महंत उपस्थित राहून दर्शन व आशीर्वचनाचा लाभ देतील. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या सप्ताहात येऊन श्रवणाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक भोगे परिवाराकडून करण्यात आली आहे.

No comments