वेले येथील अनाथाश्रम, वृद्धाश्रम व मनोरुग्ण प्रभुजी यांना अन्नदान सेवा स्वर्गवासी मीनाक्षी प्रमोद दिघडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ अन्नद...
वेले येथील अनाथाश्रम, वृद्धाश्रम व मनोरुग्ण प्रभुजी यांना अन्नदान सेवा
स्वर्गवासी मीनाक्षी प्रमोद दिघडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ अन्नदान
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील वेले येथील अनाथाश्रम, वृद्धाश्रम व मनोरुग्ण प्रभुजी यांना माननीय श्री प्रमोद पांडुरंग दिगडे, कु. अभिलाषा आणि चिरंजीव विनीत व समस्त निगडे परिवार चोपडा यांच्याकडून स्वर्गवासी मीनाक्षी प्रमोद दिगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ वेले येथील अनाथाश्रम, वृद्धाश्रम व मनोरुग्ण प्रभुजी यांना अन्नदान सेवा देण्यात आली. यावेळी दिगडे परीवारासोबत उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
बघता बघता वर्ष निघून गेले दिवस खुप लवकर निघून जातात पण काही चांगले व्यक्ती आपल्या मधून निघून गेल्या तरीही ती त्या कायम स्मरणात राहतात,
आठवणी राहतात, असेच हे व्यक्तिमत्त्व होते ते आमच्या सर्वांचे आवडते अधिपरीचारिका श्रीमती मीनाक्षी प्रमोद दिगडे यांचे कारण स्वतःच्या कामाशी एकनिष्ठ राहून लहान मोठ्यांना सांभाळत शिकवत, सर्वांना समान वागणूक देऊन सेवा देणाऱ्या अशा अधिपरिचारिका आमच्या मीनाक्षीताई नेहमीच आठवण राहतील
कारण रूग्णालयात स्वतःच्या घरा सारखे सारखे सांभाळत एकनिष्ठ काम करणे. आम्ही त्यांच्याकडून शिकलो रुग्णसेवा प्रथम, त्यांनी घेऊन स्वतःच्या जीवाशी पर्वा न करणाऱ्या कामाला महत्त्व देणाऱ्या स्वर्गवासी मीनाक्षी दिगडे ताई खूप मोठी शिकवण देऊन गेल्या त्यामुळे त्या आजही आमच्या मनामध्ये जिवंत आहेत व राहतील
शीला प्रकाश पटोकार, अधिपरिचारिका
श्री रुग्णालय मोहाडी जळगाव



No comments