रावेर तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन तर्फे आज रक्तदान शिबिर संपन्न रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) रावेर येथे...
रावेर तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन तर्फे आज रक्तदान शिबिर संपन्न
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
रावेर येथे जिल्हा संघटनेच्या मार्गदर्शनाने केमिस्ट हृदय सम्राट आदरणीय आप्पासाहेब श्री जगन्नाथ शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त रावेर तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन तर्फे महाजन एक्सीडेंट हॉस्पिटल रावेर येथे रक्तदान शिबिर संपन्न प्रथम दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन डॉक्टर सुरेश महाजन यांच्या व मान्यवरांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश महाजन हे होते व्यासपीठावर तालुकाध्यक्ष गोविंद महाजन माजी अध्यक्ष संजय चौधरी खजिनदार लक्ष्मण सावळे सचिव प्रवीण सरोदे सहसचिव अजय पाटील डॉक्टर तुषार पाटील श्री दीपक लोमटे श्री गुणवंत भंगाळे गोपाल चौधरी तेजपाल खासणे तसेच सन्माननीय कार्यकारणी सदस्य व केमिस्ट बांधव हजर होते आप्पासाहेबांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त ८८ बॅग रक्त डोनेट करण्यात आले सूत्रसंचालन लक्ष्मण सावळे यांनी केले व प्रास्ताविक संजय चौधरी यांनी केले रक्तदान शिबिरासाठी माधवराव गोडवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र जळगाव व तालुक्यातील सर्व केमिस्ट्री बांधव हजर होते या या कार्यक्रमास अंबिका व्यायाम शाळा रावेर यांचे सहकार्य तसेच रावेत तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशनचे सहकार्य लाभले

No comments