adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तोफखाना पोलिसांनी मौजमजे करिता महागड्या गाड्या चोरणाऱ्या इसमाच्या आवळल्या मुसक्या

  तोफखाना पोलिसांनी मौजमजे करिता महागड्या गाड्या चोरणाऱ्या इसमाच्या आवळल्या मुसक्या  अहिल्यानगर (दि.२४ जानेवारी):- (संपादक -:-हेमकांत गायकव...

 तोफखाना पोलिसांनी मौजमजे करिता महागड्या गाड्या चोरणाऱ्या इसमाच्या आवळल्या मुसक्या 


अहिल्यानगर (दि.२४ जानेवारी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

महागड्या मोटरसायकली मौज मजा करिता चोरणाऱ्या चोरट्यास तोफखाना पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पकडलेल्या चोरट्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांच्या तीन महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहे. कल्याण रोडवरील नेप्ती नाका येथे फिर्यादी वसंतराव गंगाधर झावरे (रा.माळीवाडा अहिल्यानगर) यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली होती यावरून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना चोऱ्या होऊ नये म्हणून सक्त पेट्रोलिंग आदेश दिले होते. दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी गुलमोहर रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना पारिजात चौक येथे एक इसम संशयितरित्या विना नंबर प्लेटची गाडी भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्याचा पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतल्या असता त्याला त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिकेत बाबासाहेब कर्जुले (रा. मोकाशी वस्ती पाईपलाईन रोड अहिल्यानगर) असे सांगितले सदरील गाडी बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ही गाडी नगर कल्याण रोडवरील नेप्ती नाका येथून चोरलेली आहे असे सांगितले. व पुणे येथून एक बुलेट व एक शाईन मोटरसायकल चोरलेली आहे अशी कबुली दिली. पोलीस पथकाने आरोपीच्या घरी जाऊन तीनही गाड्या जप्त केल्या आहे.अधिक तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे हे करीत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक शैलेश पाटील,पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ,अहमद इनामदार,गणेश धोत्रे, भानुदास खेडकर,सुधीर खाडे,सुरज वाबळे, वसीम पठाण,सुमित गवळी,शिरीष तरटे,सतीश त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीश भवर,संदीप गिऱ्हे,राहुल मस्के यांनी केली आहे.

No comments