Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी मुक्ताईनगर प्रतिनिधी ...

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल,मुक्ताईनगर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली. 

आद्यशिक्षिका, मुख्याध्यापिका, महिलांसाठी शिक्षण क्षेत्रात महिलांसाठी जे शक्य नव्हतं ते शक्य करून दाखविणाऱ्या शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज ३ जानेवारी २०२५, ला शाळेत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

जयंती प्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस या महिला मुक्ती दिनी सर्व विद्यार्थ्यांच्या, विद्यार्थिनींच्या, शिक्षिकांच्या, शिक्षकांच्या व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक व्ही के वडस्कर, विद्यार्थिनी, महिला शिक्षिका यांच्यातर्फे पुष्पमाला अर्पण करण्यात आली. 

आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावरती शाळेतील इयत्ता सातवी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी घवघवीत भाषणांचा वर्षाव केलात; भारतीय सामाजिक जीवनात अमुलाग्र असा बदल शिक्षणाच्या माध्यमातून घडविता येईल पुरातन संस्कृतित कथाकथित विचारधारेत डुबलेल्या असंतुलित सामाजिक बोटीला स्थिरता प्राप्त करून देऊन तिला योग्य प्रकारे प्रवाहित करण्याचे काम अनेक थोर पुरुषांकडून, थोर महिलांकडून करण्यात आलेले आहेत त्या सर्वात शैक्षणिक क्षेत्रात अविस्मरणीय महिलांसाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या थोर महिला म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव सदैव अविस्मरणीय राहील. अखिल भारतीय महिलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या शैक्षणिक जीवन प्रवाहात अमुलाग्र बदल घडवून आणलेला आहे याचे वास्तववादी उदाहरण आपणास समाजात वावरत असतांना अनेक अशा क्षेत्रात आज महिलांची कारकीर्द उल्लेखनीय दिसत आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्याच होय आज हा दिवस महिला मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कार्यामुळे अखिल महिला सामाजिक जीवनात झालेला अमुलाग्र बदल होय असे या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केलेत तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक सतीश गायकवाड यांच्याकडून करण्यात आले.

No comments