गांजा व चरस बाळगणा-या इसामास चोपडा शहर पोलीस स्टेशन कडुन अटक चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) दिनांक १३/०१/२०२५ रोजी चोपडा शहर पो...
गांजा व चरस बाळगणा-या इसामास चोपडा शहर पोलीस स्टेशन कडुन अटक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दिनांक १३/०१/२०२५ रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पथकाने उमर्टी चोपडा रोडवर चुचांळे ते चोपडा दरम्यान सापळा लावुन इसम प्रफुल्ल प्रमोद धुमाळ वय २६ वर्ष रा.व्यास मंदिर शिवाजी नगर यावल ता.यावल जि.जळगाव हा मोटार सायकल वरुन चोपडा शहराकडे येत असतांना त्याला ताब्यात घेतले त्याच्या अंगझडतीत १ किलो १६८ ग्रॅम सुकलेला गांजा तसेच चरस या अमली पदार्थाच्या ७२ ग्रॅम वजनच्या ८० गोळ्या मिळुन आल्या. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.०८/२०२५ एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क),२०(ब) (ii) (b)२२(b) याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी कडे मिळुन आलेला गांजा,चरस,मोटार सायकल तसेच मोबाईल फोन असा एकुण ९६,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे,सहाय्यक पोलीस निरिक्षक एकनाथ भिसे पोलीस उपनिरीक्षक अनिल भूसारे,पोहेकाँ किरण शिंपी पो.हे.कॉ.रितेश चौधरी,पो.ना.धर्मेंद्र ठाकुर,पो.कॉ.पंकज ठाकुर,पो.कॉ.रविंद्र मेढे,पोकाँ अमोल पवार,पोकाँ मदन पावरा यांनी पार पाडली.सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरी अनिल भुसारे हे करित आहेत.

No comments