adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महिलेने नदीत उडी मारल्याचे पाहून नदीपात्रात असलेल्या निमगव्हाण येथील भील समाजातील तरुणांनी वाचवले प्राण

  महिलेने नदीत उडी मारल्याचे पाहून नदीपात्रात असलेल्या निमगव्हाण येथील भील समाजातील तरुणांनी वाचवले प्राण  त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत...

 महिलेने नदीत उडी मारल्याचे पाहून नदीपात्रात असलेल्या निमगव्हाण येथील भील समाजातील तरुणांनी वाचवले प्राण 

त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ,चोपडा येथील डी वाय एस पी अण्णासाहेब घोलप यांच्या हस्ते भील समाजातील तरुणांचा सत्कार


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

चोपडा :- तापी नदीच्या पुलावरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील रहिवासी ममता गोपाल पाटील (३२) या विवाहितेने तापी नदीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता मात्र तीन-चार फूट पाण्यात उडी मारल्याने त्या बचावल्या. महिलेने नदीत उडी मारल्याचे पाहून नदीपात्रात असलेल्या निमगव्हाण येथील एकनाथ भील, कैलास भील व तांदलवाडी येथील लहान्या भील यांनी निमगव्हाण येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र भाटिया यांना सदरची माहिती दिली.भाटिया यांनी सांगितल्यानुसार एकनाथ भिल व लहान्या भील यांनी महिलेला पाण्याच्या बाहेर काढून राजेंद्र भाटिया यांनी तात्काळ कमलेश बाविस्कर यांच्याशी संपर्क साधून रुग्णवाहिकेसह नदीपात्रात हजर झाले. महिलेला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावर तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आणि डॉ. चंद्रहास पाटील यांनी उपचार सुरू केले. या महिलेला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेल्याचे भाटिया यांनी सांगितले तर सदरील महिलेने दोनशे ते सव्वा दोनशे फूट उंचावरून उडी मारल्याने महिलेचा डावा पाय फॅक्चर झाल्याचेही राजेंद्र भाटिया यांनी सांगितले. जीवनाला कंटाळून या महिलेने आपली दोन्ही चिमुकले मुले नातेवाइकांकडे वेले येथे सोडून आत्महत्येचा प्रयत्न केला.


सदर तरुणांनी मदत केल्यामुळे महिलेचा जीव वाचलेला असून त्या महिलेची मदत करणाऱ्या तरुणांचा सत्कार डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांचे हस्ते करण्यात आला तर सत्कार करतेवेळी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर उपस्थित होते

No comments