जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक हेक्टरी ५००० रुपयांच्या अनुदाना पासून ७३,७६९ शेतकरी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे -:-संदीप ...
जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक हेक्टरी ५००० रुपयांच्या अनुदाना पासून ७३,७६९ शेतकरी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे -:-संदीप पाटील, शेतकरी संघटना
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
मागच्या वर्षी कापूस व सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी बाजार भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कुठेतरी भरून निघावं म्हणून शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५०००/- रुपये अनुदान जाहीर केलं मात्र गाव पातळीवरील बहुतांश शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी करून सुद्धा गाव पातळीवर प्राप्त झालेल्या याद्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नाव नसल्याने तसेच जिल्ह्यातील ७३,७६९ पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नसल्याची माहिती शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली
सन २२/ २३ मध्ये जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सहभाग नोंदवून कापूस व सोयाबीनच्या पिक विमा उतरवलेला आहे त्यासाठी ई पीक पाहणी केली असूनही त्या शेतकऱ्यांचे याद्यांमध्ये नाव नाहीत तसेच इतर बऱ्याच
अडचणी या ठिकाणी उद्भवलेल्या असून याबाबत तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी विभागांच्या माध्यमातून गाव पातळीवरील वंचित राहत असलेल्या शेतकऱ्याचे उपलब्ध असलेल्या उताऱ्यावरील पीक पेऱ्याची माहिती संकलन करून अर्थसहाय्य मंजूर करण्याचे आदेश दिले होते मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजूनही "त्या" शेतकऱ्यांची माहिती संकलित केली नसल्याने त्या शेतकऱ्यांना अनुदान पासून वंचित राहावे लागत आहे. मध्यांतरी विधानसभा निवडणुका झाल्या त्या नंतर राजकीय घडामोडी व सत्तास्थापन करण्यात बऱ्याच वेळा निघून गेल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ७३,७६९ कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी अनुदान साठी पात्र आहेत मात्र त्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही जिल्हाधिकारी व कृषी अधिक्षकांनी शासनाकडे पाठपुरावा करून अनुदानाची रक्कम प्राप्त करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी जेणेकरून कुठलाही शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही याकरिता आपण आपल्या स्तरावरून नसलो कृषी विभागाला आदेशित करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे
प्रतिक्रिया
जळगाव जिल्ह्यातील एक केंद्रीय मंत्री व तिन कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील ७३,७६९ शेतकऱ्यांना अनुदानाची खात्यावर जमा करून न्याय द्यावा
संदीप पाटील
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना

No comments