राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा :- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पु...
राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा :- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व पूजन करून बौद्ध समाजाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.राजमाता जिजाऊ यांच्या संस्काराने छत्रपती शिवाजी महाराज घडले छत्रपती संभाजी महाराज घडले राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरी मुक्त स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना लिहिली अशा संस्कारी राजमाता जिजाऊ जयंती चोपडा शहर व तालुक्यातील बौद्ध समाज व भीमअनुयाई यांच्यावतीने साजरी करण्यात आली.प्रथमता महिला बघीनींनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापुरुषांच्या नावाचे घोषणा देण्यात आल्या व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
तरी या कार्यक्रमास लुंबिनी प्रवीण करनकाळे या चिमुकलीने राजमाता जिजाऊ यांच्या जीवना बद्दल भाषण सादर केले.बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सचिन अशोक बाविस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास उपस्थित निळे निशान संघटनेचे पदाधिकारी अनिता बाविस्कर,बबीता बाविस्कर,दीपक बाविस्कर,आर पी आय माजी तालुकाध्यक्ष भिवराज रायसिंग,आरपीआय तालुका अध्यक्ष बापू शिंदे,अशोक अर्जुन बाविस्कर,सुदाम ईशीआप्पा,दिवाणजी साळुंखे,समाधान सपकाळे,गंगाधर सावते,सुभाष बाविस्कर,विजय शंभरकर,माधव भालेराव,गोकुळ रामदास बाविस्कर,गौतम जाधव,महेंद्र वानखेडे,व समस्त समाजबांधव व बघिनीं उपस्थित होते.प्रवीण करनकाळे यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले

No comments