adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी रोजी वाडिया पार्क येथे होणार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती;एकूण ४२ संघ सहभागी होणार

  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी रोजी वाडिया पार्क येथे होणार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती;एकूण ४...

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी रोजी वाडिया पार्क येथे होणार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती;एकूण ४२ संघ सहभागी होणार 


अहिल्यानगर (दि.८ प्रतिनिधी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६७ व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दि.२९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ दरम्यान वाडियापार्क मैदान, अहिल्यानगर येथे होणार आहे अशी माहिती

अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पत्रकार परिषदेत आ. संग्राम जगताप यांनी दिली.या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास संलग्न असलेल्या ३६ जिल्हे ६ महानगरपालिका असे एकुण ४२ संघ सहभागी होत आहेत.या स्पर्धेत एकूण ८४० कुस्तीगीर सहभागी होत असून स्पर्धे दरम्यान ८५० ते ९०० कुस्त्या होतील. स्पर्धेत १०० पंच व ८० पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडणार आहेत.स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे,सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर,बाला रफीक शेख,महेंद्र गायकवाड,पृथ्वीराज मोहोळ,वेताळ शेळके, माऊली कोकाटे,शुभम शिंदनाळ,सुदर्शन कोतकर,माऊली जमदाडे यांचे आकर्षण असणार आहे.स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री

देवेन्द्रजी फडणवीस,उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय राज्यमंत्री पै.मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मा.खा. रामदासजी तडस उपस्थित राहणार आहेत.दि. ८ जानेवारी नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदिप (आप्पा) भोंडवे व सरचिटणीस हिंद केसरी पै.योगेश दोडके अहमदनगर (अहिल्यानगर) कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ.संग्राम जगताप, उपाध्यक्ष पै.अर्जुन (देवा) शेळके,महाराष्ट्र केसरी पै.अशोक भाऊ शिर्के,महाराष्ट्र केसरी पै.गुलाब बर्डे,सचिव प्रा. डॉ.पै.संतोष भुजबळ, सहसचिव पै.प्रविण घुले सर्व पदाधिकारी व शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी उपस्थित होते.

No comments